अठरा वर्षानंतरही गुगल सर्वोत्तम

Vishnu Vajarde's New Paper Article on Google's 18th birthday

 

Vishnu Vajarde's New Paper Article on Google's 18th birthday
Vishnu Vajarde’s New Paper Article on Google’s 18th birthday

जगातील नंबर एकचे इंटरनेट सर्च इंजिन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गुगलने काल (२७ सप्टेंबर ला) आपला अठरावा वाढदिवस साजरा केला. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन या मित्रांनी लावलेल्या रोपट्याचा आज एक महान वटवृक्ष बनला आहे. आज ही दोघे अनुक्रमे 12वे आणि 13वे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 1995 ला हे दोघे मित्र एकत्र आले. 1996 ला गुगल सुरु करण्यावरती रिसर्च सुरु झाला. 1997 ला Google.com हे डोमेन रजिस्टर करण्यात आले आणि 1998 साली प्रत्यक्षात गुगलचे कार्य चालू झाले. आणि आज गुगल ही एक इंटरनेट क्षेत्रातील सर्वोत्तम कंपनी आहे. गुगल बिजनेसमध्ये तर सर्वोत्तम आहेच पण त्यांनी लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आणि दरवर्षी करोडो डॉलर गुगल कडून गोर-गरिबांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना दान केले जातात. सामाजिक क्षेत्रात्तील त्यांचे हे कार्य खूप मोठे आहे. कदाचित त्यांच्या या सर्वांगाने होत असणाऱ्या सकारातमक कार्यामुळेच त्यांना टक्कर देणाऱ्या अनेक कंपन्या येत असल्या तरी आजही गुगल सर्वोत्तम स्थानी आहे. आपण गुगुलच्या या वाढत गेलेल्या वटवृक्षाची वाढ कशी होत गेली ते थोडक्यात पाहूयात..

1998 : लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली. संघटनांची माहिती ऑनलाईन करून त्यांना मदत व्हावी या उद्देशाने त्यांनी गुगल ही एक सर्चेबल सिस्टम बनवली.

2000 : गुगल.कॉम हे 10 विविध भाषांच्या वर्जिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आले. आणि सध्या 150 हुन अधिक भाषांमध्ये ते उपलब्ध आहे.

2001 : गुगुल ईमेज सर्च ची सुरुवात करण्यात आली. आणि त्यावेळी याद्वारे लाखो ईमेजीस अॅक्सेस केल्या जायच्या.

2002 : 4000 न्यूजसोर्सच्या माध्यमातून गुगल न्यूज सुरु करण्यात आले. आज तब्बल 50,000 न्यूजसोर्स आणि 70 हुन अधिक प्रादेशिक आवृत्त्यांमध्ये आज गुगल न्यूज उपलब्ध आहे.

2004 : 2004 च्या एप्रिलफुल च्या दिवशी गुगल ने जीमेलची सेवा चालू केली. आणि सध्या सर्वाधिक वापरली जाणारी ईमेल सेवा म्हणून जीमेल प्रसिद्ध आहे. अब्जावधी लोक सध्या जीमेल वापरतात.

2005 : गुगल कडून गुगल अर्थची सुरुवात करण्यात आली. सॅटेलाईट्सच्या माध्यमातून आपल्या ठिकाणाची व्हरच्युअल जर्णी देण्याचं काम गुगल अर्थने केलं.

2006 : व्हिडीओ शेअरिंग मध्ये जगात नंबर एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युट्युबला $1.65 blilion ला विकत घेतले.

2008 : गुगल क्रोम या वेब ब्राऊजरची गुगुल कडून निर्मिती करण्यात आली. सध्या जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा वेब ब्राऊजर म्हणजे गुगुल क्रोम होय.

2010 : आपण स्वयंचलित कार बनवत असल्याची घोषणा गुगल ने केली.

2012 : गुगल ग्लासची निर्मिती करण्यात आली. हा एक असे चष्माप्रमाणे डीव्हाईस आहे कि ज्या ज्याकडे स्मार्टफोनचा हँड्सफ्री पर्याय म्हणून पाहिलं जातं. याच वर्षी गुगल वरती रेकॉर्ड ब्रेक 3.5 मिलियन दिवसाला सर्च होऊ लागले.

2015 : अल्फाबेट नामक कंपनी बरोबर, संपूर्ण शहर पुनर्रचनेवरती ते कार्य करत असल्याचे जाहीर केले.

अर्थात हा आपण थोडक्यात आढावा घेतला. याही पेक्षा तंत्रज्ञान क्षेत्रात अजून खूप मोठी पाऊलं गुगल टाकत आहे.

– विष्णू वजार्डे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *